Climate Change Adaptation Program हवामान बदल स्विकृतीकरन कार्यक्रम

DSCN4497

आपणां सर्वांच्या जगण्याचा मूळ आधार निसर्ग हाच आहे. निसर्गातील पाणी हा घटक निसर्गाचा मुख्य आधार आहे. जगाच्या पाठीवर असलेली सर्व माणसे, पशू, पक्षी, किटके आणि वनस्पती यांचेसाठी “ पाणी हे जीवन आहे “. जमीनीच्या खाली आणि जमीनीच्या वर असलेल्या पाण्याचा मुख्य स्त्रोत पर्जन्य राजा आहे. आजच्या परिस्थितीत पर्जन्य राजा लहरी बनलेला आहे. अलीकडच्या काळात पावसाच्या येण्यात आणि जाण्यात पूर्वीसारखा नियमितपणा राहीलेला नाही, अवेळी पाऊस येणे आणि गारपीठ होणे, यामुळे शेती आणि शेतकरी सर्वाधिक नुकसानीत आलेले आहेत. यामुळे अन्नधान्य टंचाई आणि शेती उत्पनात घट झालेली आहे.

जगाच्या पाठीवर झालेला औद्योगिक विकास आणि त्यामुळे झालेले प्रचंड प्रदूषण, जंगलाची आणि झाडा-झुडपांची झालेली वाताहत आणि लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ या प्रमुख कारणामुळे पृथ्वीवरचे वातावरण अर्थात तापमान अधिक वेगाने वाढत आहे, यामुळे हवामानात बदल झालेला आहे, या बदललेल्या हवामानामुळे पाऊस अनियमित झाला आहे. बदलेले हवामान एकाएकी आणि आपोआप कांही मूळ स्थितीत येणार नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या स्तरावर एवढेच करु शकतो की, आपल्या स्थानिक भागातील नैसर्गिक संसाधणांची जपणूक करून पुर्वीच्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करणे आणि आताच्या बदलेल्या हवामानाच्या अनुकूल शेती करणे.

वर उल्लेखित उपाय-योजणांचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील एकूण ४ गाव शिवारातील मातीची जपणूक करणे, जमीच्या भूगर्भातील आणि भूस्तरावरील पाण्याच्या साठ्यात जाणीवपूर्वक वाढ करणे, शिवारातील झाडांची संख्या वाढविणे. जैविक शेती पध्दतीचा अवलंब करणे आणि बदलत्या हवामानानुसार पीक पध्दतीत बदल करणे असा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घेत आहोत. हा “ हवामान बदल स्विकृतीकरण कार्यक्रम “ लोकसहभागातून यशस्वी करावयाचा आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ गावशिवारातील विविध प्रकारच्या झाडांचे बियाणे जमा करून , त्यांची परत त्या-त्या गाव शिवारात लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यानुषंगाने झाडांच्या बिया जमा करणे कामी गावातील शालेय मुलांचा सक्रीय सहभाग घेण्यात आलेला आहे .

कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेल्या उद्दीष्टापर्यंत पोहंचण्यासाठी गावातील लोक, ग्राम पंचायत आणि विविध शासकीय खात्यांच्या सहभाग अपेक्षित आहे. विकास आणि बदलाच्या कार्यक्रमात सक्रीय लोकसहभाग असल्याशिवाय कार्यक्रम खर्या. अर्थाने यशस्वी होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन लोक संगठन आणि त्यांची क्षमता बांधनी व्हावी यानुषंगाने अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यात किशोर मुले, युवक आणि महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्या क्षमता बांधनीसाठी अनेकविध प्रशिक्षण आणि स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

Advertisements